* सुस्वागतम * 'साहित्य दरबारात' आपले स्वागत आहे

-----------------------------------------------------

गाणी ऐका

Powered by eSnips.com

Sunday, September 21, 2008

आकाशाशी जडले नाते

(........आकाशाशी जडले नाते !!)
प्रभुश्रीराम, गदिमा, सुधीर फडके यांची माफी मागुन हे विडंबन--
-----------------------------------------------------------------------------
आकाशाशी जडले नाते, जेट एअरवेजचे !
टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!
गोयंकाने सहज उचलिले वीर इंडियन्सचे !
पुर्ण जाहले मॅनेजमेंटच्या हेतु अंतरीचे !
कमी जाहले प्रवास भाडे, जो तो झेपावे !!
टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

मुग्ध प्रवासी सहज न्याहळी जेट पंखधारी !
नयनांमाजी एकवटुनिया धावपट्टी सारी !
उडू लागले विमान हळू हळू, जो तो आनंदे !!
टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

हात जोडुनी म्हणे सुंदरी प्रवास-जनतेशी !
"आज सेवा अर्पियली मी अपुल्या चरणाशी" !
आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने !!
टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

झुकले थोडे विमान, प्रवासी घाली सुरपट्टा !
वैमानीकही सुचना देती साथी-दारांना !
त्यांच्या कानी गजर पोचले, विमान लँडीगचे !!
टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

असंख्य झाल्या विमानसेवा, असंख्य उड्डाने !
एटीसी( ATC ) ते सिग्नल देती कंट्रोल जीवनाचे !
आकाशाशी जडले नाते ऐसे दुनीयेचे !!!
टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

0 Comments: